१५०० मिमी जलवाहिनीच्या सफाईचे काम वेगात

Foto

नवीन पाणीपुरवठा योजनेद्वारे अतिरिक्त पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो):
शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नक्षत्रवाडी ते हसूल दरम्यान १५०० मिमी व्यासाची १७ किलोमीटर लांबीची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीच्या अंतर्गत साफसफाईचे काम गेल्या आठवड्यापासून युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत सुमारे सात किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीची साफसफाई पूर्ण झाली असून, उर्वरित काम पुढील दोन आठवड्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण होताच शहरातील पाणीटंचाई दूर होण्यास मोठा दिलासा मिळणार आहे.
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या
माहितीनुसार, सध्याची जुनी वितरण यंत्रणा खिळखिळी झाली असून, ती केवळ २० एमएलडीपर्यंतच्या अतिरिक्त पाण्याचा भार पेलू शकते. या मर्यादेपेक्षा जास्त पाण्याचा दाब दिल्यास
नऊ जलकुंभ भरणार
▶ नक्षत्रवाडी ते हसूल दरम्यानची १५०० मिमी व्यासाची नवीन मुख्य जलवाहिनी कार्यान्वित होताच शहरासाठी मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. या जलवाहिनीमुळे मार्गावरील जोडणी असलेल्या एकूण नऊ जलकुंभांना पुरेसा पुरवठा होईल. यात प्रामुख्याने सिडको एन-५ मधील दोन जलकुंभ, सिडको एन-७, शिवाजीनगर आणि इतर परिसरांचा समावेश आहे. सध्या शहरात अनेक दिवसांआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील गॅप आता कमी होऊ शकतो. पाण्याचा फेरा थेट ३ ते ४ दिवसांवर आणणे महापालिकेला शक्य होणार असल्याने सिडकोसह इतर भागांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
जुन्या जलवाहिन्या फुटण्याचा मोठा धोका आहे. सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नक्षत्रवाडी येथे दररोज ४० एमएलडी पाणीपुरवठा करत आहे. हे अतिरिक्त पाणी शहरात सुरक्षितपणे आणण्यासाठी
नवीन १५०० मिमीची जलवाहिनी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ही वाहिनी कार्यान्वित झाल्यानंतर जुन्या यंत्रणेवरील ताण कमी होऊन शहराचा पाणीपुरवठा सुधारेल.